बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबी-एनसीपी वाद पेटला! वानखेडे म्हणतात मी नव्हतोच, मलिकांनी पुरावे दाखवले

मुंबई | राज्यासह देशात सध्या महाराष्ट्रातील एनसीबी आणि एनसीपीमधील वाद गाजत आहे. एनसीबी मुंबईचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांचं समीर वानखेडे यांनी खंडण केलं होतं. पण आता नवाब मलिक यांनी थेट पुरावे माध्यमांसमोर ठेवले आहेत.

समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे दुबईच्या हाॅटेल ग्रॅंड हयातमध्ये 10 डिसेंबर 2020 ला गेले होते. वानखेडे खोटं बोलत आहेत म्हणून मी पुरावे देत आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. सुशांत सिंग प्रकरणानंतर वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणण्यात आलं आहे. तेव्हापासून वानखेडे बाॅलिवूडच्या मागे लागले आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

बाॅलिवूडमधील सर्व कलाकार जेव्हा कोरोना काळात मालदिव आणि दुबईमध्ये होते. तेव्हा समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे तिथं खंडणी वसूलीसाठी गेले होते, असे गंभीर आरोप वानखेडे यांच्यावर मलिक यांनी केले आहेत. दुबईच्या ग्रॅंड हयात हाॅटेलमधील वानखेडे यांचे फोटो सुद्धा मलिक यांनी ट्विटरवर टाकले आहेत.

दरम्यान, समीर वानखेडे सध्या एनसीबीमध्ये केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. एनसीबीनं मुंबईत क्रुझवर कारवाई केल्यापासून राज्यातील वातावरण चागलंच पेटलेलं आहे. नवाब मलिक यांच्या पुराव्यानिशी केलेल्या आरोपांवर वानखेडे आणि एनसीबी काय स्पष्टीकरण देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा ट्विट

 

थोडक्यात बातम्या

तारीख पे तारीख! टीईटीची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली – नाना पटोले

वर्ल्ड चॅम्पियन! डीजे ब्रावोच्या गाण्यावर थिरकले कॅरेबियन खेळाडू; पाहा व्हिडीओ

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More