नागपूर | काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण खराब झालं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना मारण्यात आलं. मात्र 7-8 दिवस झाले तरी अजून त्यांच्या एकाही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे समाजात फिरताना असुरक्षित वाटत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
सध्या फॅसिझमविरोधात जो बोलतो त्याला टार्गेट केलं जात आहे. तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी या सरकारकडे आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी करत असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.
महाविकासआघाडीचं सरकार पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या माणसांना हे सरकार सुरक्षा देईल, असा मला विश्वा असल्याचंही यावेळी बोलताना मिटकरी यांनी म्हटलं.
दोन-तीन वर्षांपूर्वी धमकीचे फोन आणि मेसेजेस आले होते. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. यावर मागच्या सरकारच्या काळात काही कार्यवाही झाली नाही, असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना घरच्या मैदानात रोखणार राष्ट्रवादी??
‘मोदींनी जे गुजरातचं केलं तेच दिल्लीचं करत आहेत’; इम्रान खान यांचं मोदींवर टीकास्त्र
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी
सुप्रिया सुळेंनी केलं रक्षा खडसेंचं कौतुक; नाथाभाऊ म्हणतात…
एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच केलं फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले…
Comments are closed.