पवारांना धक्का देत ‘या’ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

मुंबई | मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपची मेगा भरती आज पार पडली. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

शरद पवार यांचे एकेकाळचे साथी मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक आणि चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर या नेत्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!