बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारच्या ‘या’ निर्णयाविरूद्ध इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

मुंबई |  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारे निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. याचा फटका बारामतीसह इंदापुरला बसणार आहे. याच विरोधात इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देऊ, अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे.

दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याला सरकारने मनावर घेत बारामतीचं पाणी बंद केल्याने भाजपने पवारांना मोठा शह दिल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून धुसपूस?? आदित्य ठाकरे म्हणतात…

-तुमची ‘नाटकं’ बंद करा अन्यथा ‘नाटक’ बंद; अभिनेता सुमित राघवन भडकला

-अखेर ठरलं! बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात

-राज्यातील विद्यमान 40 आमदारांचं भाजप तिकीट कापणार???

-काँग्रेसचा ‘हा’ माजी आमदार प्रकाश आंबेडकरांच्या गळाला??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More