बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला गुंडगिरीच करायची असती तर मी…’; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

सातारा |  राज्यातील सातारा जिल्हा बॅंक (Satara District Bank Election) निवडणूक यावेळी विशेष चर्चेत राहिली आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक पराभव राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा ठरला. त्यातच शशिकांत शिंदे यांना षडयंत्र रचून पाडण्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असतानाच आता शिंदे यांनी अखेर या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला त्यादिवशी राष्ट्रवादीचे नेते वसंत मनकुमरे यांनी तुफान डान्स केला होता. यावरून शिंदे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘माझा पराभव झाला त्याच दिवशी माझ्या विरोधात कट कारस्थान करणारे नाचले हे सर्वांनी पाहिले,’ असं सुनावत पुढे त्यांनी भाजपचे आमदार शिेवेंद्रसिंह राजेंवर नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ‘अखेरपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश का आले नाही. कारण त्यांनी मनापासून प्रयत्न केलेचं नाहीत,’ असा आरोप शिंदेनी केला आहे.

शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. त्यांनी पुढे विरोधकांवर निशाणा साधताना म्हटलं आहे, ‘मला गुंडगिरी करायची असती तर मी गोव्यापासून सावतंवाडी पर्यंत जिथे जिथे उमेदवार असतील. तिथून उचलून आणले असते, पण ते माझ्या रक्तात नाही,’ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. पण त्यांच्या पराभवाला पक्षातील गटबाजीचं कारणीभूत ठरली असल्याचं  बोललं जात आहे. सर्वपक्षीय पॅनल असूनही ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांना पराभवाचा झटका दिला आहे. ज्ञानदेव रांजणे हे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

थोडक्यात बातम्या-

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More