Top News देश

कृषीमंत्री असताना पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर केला खुलासा; म्हणाले…

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. भाजपवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालीन कृषीमंत्री शरद पवारांनी कृषी कायद्यामध्ये बदल करण्यासाठीच्या पत्राचा उल्लेख केला होता. अशातच या पत्राबाबत पवारांनी खुलासा केला आहे.

युपीए सरकार असताना त्यावेळी तत्कालीन कृषीमंत्री अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं पत्रात म्हटलं होतं. याचाच उल्लेख फडणवीसांनी केला. ते पत्र सध्या सोशल माध्यमांवर चांगलंच व्हायरल झालेलं दिसत आहे. यावर पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नसल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, याला जास्त महत्व देऊ नका. विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप पवारांनी यावेळी बोलताना केला.

थोडक्यात बातम्या-

“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री?”

देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं जगातील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य’; राऊतांचं नागरिकांना आवाहन

‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’; अभिनेता हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या