Ramnath Kovind - राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल
- महाराष्ट्र, मुंबई

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल

मुंबई | भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांचं स्वागत केलं.

आजच्या दौऱ्यात कोविंद एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदारही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, रामनाथ कोविंद ‘मातोश्री’वर जाणार नसल्याची माहिती मिळतेय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल

Comments are closed.