Top News राजकारण

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

नागपूर | ओबीसींच्या मुद्द्यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा आक्रमक झालेत. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू अशा इशारा दिलाय.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा. एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. त्याचसोबत ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे”

मेगा भरती नंतर करा, पहिल्यांना ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, असंही ते म्हणालेत.

मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही. त्याचप्रमाणे जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना तिथे मत मागताना लाज वाटत नाही का?, असा सवालही त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मुंबई- महाराष्ट्रावरही कोरोनाची टांगती तलवार, शिवसेनेचा सर्तकतेचा सल्ला

विशेष पथके नेमून तातडीने आष्टीतील बिबट्याला जेरबंद करा- धनंजय मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या