बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईमधून जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं होतं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं होतं. अशातच आज नारायण राणेंनी, मी माझ्या पैशाने दोन महिन्यात बाळासाहेब यांचं दर्जेदार स्मृतीस्थळ बांधून दाखलतो, असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे.

एका बाजूला बाळासाहेप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसरीकडे बाळासाहेबांनी राज्याची सेवा करण्यासाठी अधिकार दिले होते त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखं त्यांचं वर्तन असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचं समर्थन केलं ही त्यांची मजबुरी आहे. फडणवीस राणेंच्या मागे फरफटत जात असून अशा फरफटत जाण्याचा अर्थ त्यांना काही दिवसात समजून येईल. आमच्यावर बोलल्याशिवाय राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते आमच्यावर बोलत असल्याचं गोऱ्हे यांनी म्हणाल्या.

दरम्यान, नारायण राणेंना मंत्री पद मिळालं म्हणून ते सतत बोलून लोकांची दिशाभूल करत राहतात. त्यांचा एवढाच त्यांचा अजेंडा आहे, नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. त्यासोबतच त्यांनी, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा पद्धतीचं बोलणं राणेंचं असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

…अन् भीतीपोटी आईने काळजाच्या तुकड्याला सोपवलं सैन्याकडे; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘राज ठाकरेंच्या बोलण्यानं…’; जातीयवादाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भारतीय सैन्याच्या गढवाल रेजिमेंटच्या कवायतीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

स्वप्निल शिंदे प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा, स्वप्निलच्या आईने फोडला टाहो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More