मनोरंजन

नेहा कक्कर अडकणार लग्न बंधनात, या गायकाशी करणार लग्न?

मुंबई | बॉलिवूड गायिका नेहा कक्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे ती चर्चेत असते पण सध्या इंडियन आयडॉलच्या सेटवर तिच्या लग्नाची तयारी सुरु असल्यामुळे ती चर्चेत आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंडियन आयडलच्या पुढच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणचे वडिल उदित नारायण आणि त्यांची पत्नी दीपाने शोमध्ये हजेरी लावल्याचं दिसत आहे.

उदित नारायण आणि आदित्य नेहाची मस्करी करताना दिसत आहेत. मी हा शो पहिल्या दिवसापासून पाहिला आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे शोमधील सर्वच स्पर्धक टॅलेंटेड आहेत आणि दुसरं म्हणजे नेहा कक्करला सून म्हणून घरी आणण्याचा विचार करत आहे, असं उदित नारायण म्हणाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ शोचा एक भाग असू शकतो. कारण शोमध्ये आदित्य सतत नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या