बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीच्या फोटोवरुन नवा वाद; इरफान म्हणतो, मी तिचा मालक नाही!

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपली पत्नी सफा बेग हिचा चेहरा ब्लर करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. त्यामुळे यावरून नवा वाद सुरू झाला आहे. इरफान पठाण सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. मात्र त्याने आपल्या पत्नीच्या फोटो ब्लर केल्याने ट्रोलर आर्मीने त्याच्यावर निशाणा साधला आहे.

हा फोटो माझ्या क्वीनने माझ्या मुलाच्या अकाऊंटवरुन फोटो पोस्ट केला होता. पण या फोटोमुळे लोकांच्या खूप नकारात्मकतेला सामोरं जावं लागत आहे. मला तो फोटो इथेही पोस्ट करू द्या. माझ्या पत्नीने स्वत:च्या मर्जीने तो फोटो ब्लर केला आहे आणि मी तिचा मालक नाही तिचा सोबती असल्याचं इरफान पठाणने म्हटलं आहे.

इरफान पठाण आपली पत्नी सफा बेगसोबतचे फोटो पोस्ट करतो त्यामध्ये सफाचा चेहरा कायम झाकलेला दिसतो. सफा बेग हिच्या चेहर्‍यावर नेहमी बुरखा असतो किंवा ती स्वत: चा चेहरा हाताने लपवते. मात्र आता या फोटोमुळे इरफानला टीकेला सामोरं जावं लागत आहे.

दरम्यान, इरफानच्या पत्नी सफा बेगचा हैदराबाद येथे 28 फेब्रुवारी 1994 साली जन्म झाला. मात्र ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली आणि तिथेच तिनं शिक्षण पूर्ण केलं. आखाती देशांत सफा मॉडल होती.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official)

थोडक्यात बातम्या- 

होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायर व्हिडीओ

‘उद्धव, मी तुझी शिक्षिका…’; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More