ब्रिटन | संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलंय. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं समोर आलं असताना एक नवी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे ब्रिटनमध्ये रूग्णांची संख्या वाढत असल्याचं म्हटलं जातंय.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. यामुळे आता लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बुधवारपासून लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे केवळ 7 दिवसांत काही भागांमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दुपट्टीने वाढली आहे. यासाठी लॉकडाऊनच्या नवीन निर्बंधांची घोषणा केलीये.
“ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आलाय. दरम्यान इंग्लंडच्या आग्नेय भागांमध्ये रुग्णसंख्या वाढीमध्ये हेच प्रमुख कारण असण्याची शक्यता असल्याचं,” मॅट म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करणाऱ्या मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार?”
पृथ्वी शॉच्या अफलातून लेग स्पिनने सर्वांना झाली शेन वॉर्नची आठवण; पाहा व्हिडीओ
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला
‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???