बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्कसंदर्भात नव्या सूचना, प्रत्येकाला ‘या’ सूचना माहितच असायला हव्यात!

मुंबई | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता मास्कसंदर्भात नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे डबल मास्क घालण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. डबल मास्कमुळे तुम्हाला कोरोनाच्या विषाणूंपासून अधिक संरक्षण मिळू शकेल.

डबल मास्कमुळे आपलं तोंड पूर्णपणे कव्हर होतं. त्यामुळे कोरोनापासून सरंक्षण होण्यास अधिक मदत होते. तसेच तुम्ही फक्त कापडी मास्क वापरत असाल तर तुम्ही कोरोनापासून 51.4 टक्के सुरक्षित आहात. पण एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क म्हणजेच तुम्ही डबल मास्क वापरलात तर यामुळे तुम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे

तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा अन्य कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी काम करत असाल तर डबल मास्कचा वापर करा. मात्र तुम्ही एन-95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला डबल मास्क वापरण्याची गरज नाही.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार हा हवेद्वारे होत आहे, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मेडिकल जर्नल Lancet च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला होता. यानंतर दोन मास्कचा वापर करा, असं आवाहन राज्याच्या टास्क फोर्सकडून देखील याआधी करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

हाही काळ निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल- उद्धव ठाकरे

“नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे थांबवावं”

कोरोना व्हायरसची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजन कमी पडणार नाही- उद्धव ठाकरे

राज्याला रोज 50 हजार इंजेक्शनची गरज मात्र केंद्राकडून फक्त…- उद्धव ठाकरे

लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More