बाळासाहेबांच्या स्मारकाची वीट नाही रचली; निघाले राम मंदिर बांधायला!

रत्नागिरी | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईतील स्मारकासाठी उद्धव ठाकरेंना साधी एक वीटही रचता आली नाही, आता निघाले राममंदिर बांधायला, असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवरून लगावला आहे. 

राम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जनमेजयशरणजी महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी महाराजांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येला येण्याचं निमत्रंण दिलं. त्यावेळी राम मंदिर बांधण्यासाठी आपण एका पायावर तयार आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं, त्यावरून निलेश राणेंनी टीका केली आहे.

मी ऐकलं शिवसेना पक्षप्रमुख चालले अयोध्येत राममंदिर बनवायला, मुंबईत बाळासाहेबांच्या स्मारकांची एक वीट सुद्धा बसवली नाही अजून, ह्याला म्हणतात कशात काय अन् फाटक्यात पाय, असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर पेट्रोल-डिझेलचे दर 50-60 रूपयांवर स्थिर राहू शकतात

-…हा मुलगा भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे; अखेर सचिनची भविष्यवाणी खरी ठरली!

-सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं दिली- नितीन गडकरी

-प्रकाश आंबेडकरांनी भाजपला पाठिंबा द्यावा- रामदास आठवले

-देशासाठी भाजप आणि संघाच्या नेत्यांचा कुत्राही मेला नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या