Top News

अशोक चव्हाण ‘आदर्श’चा बदला काँग्रेस पक्ष संपवून घेत आहेत- नितेश राणे

कोल्हापूर | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणावरुन काढण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस संपवून ते बदला घेत आहेत, अशी गंभीर टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरुन काही काँग्रेस आमदारांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

चांगलं काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची वेळी काँग्रेसवर आली आहे. त्यामुळे त्यांनी याचं आत्मचिंतन करावं, असंही राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, नितेश राणे, कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

-नरेंद्र मोदींना आत्तार्यंत कोणकोणत्या प्रकरणी मिळालं क्लीन चीट!

-केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आणखी 2160 कोटी रूपयांची मदत

-फाईनलचं तिकीट कोण मिळवणार? पहिला क्वालिफायर सामना आज

-DYSP च्या निष्काळजीपणामुळे 16 जवानांचा मृत्यू; वीरपत्नीचा गंभीर आरोप

-राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणणं मोदींना पडलं महागात; काँग्रेसने दाखल केली तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या