शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती; नितेश राणेंचं टीकास्त्र

मुंबई | आदरणीय शरद पवार यांच्याकडे मराठा समाज मोठ्या आशेनं पहात होता, मात्र त्यांनी निराशा केली, असं काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या मुलाखतीसंदर्भात ते बोलत होते. 

मराठ्यांना आरक्षण देतानाच आर्थिक निकष का आणले जातात?? आम्हीच सगळं सहन का करायचं? असा सवालही त्यांनी विचारलाय. 

आरक्षण देताना आर्थिक निकषांवर देण्यात यावं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.