Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय?’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

Photo Credit- Twitter / @CMOMaharashtra

सिंधुदुर्ग | महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. अशातच राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळाचं अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे तर नाईट कर्फ्यू आणि संचारबंदीचे आदेश प्रशासनाने काही जिल्ह्यात दिले आहेत. एकीकडे राज्यात कोरोना वाढत चालला आहे तर दुसरीकडे मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारमधील मंत्र्यांना टोला हाणला आहे.

एक मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येत आहेत. राज्यभर फिरणाऱ्या मंत्र्यांना आठ दिवसांमध्ये झालेला हा कोरोना खरा आहे की, हा राजकीय कोरोना आहे?, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. आत्तापर्यंत त्यांना कधी कोरोना झाला नाही आणि अधिवेशनाला मात्र आठ दिवस शिल्लक असताना त्यांनात कोरोना झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही असा प्रश्न माझ्या मनात आला असल्याचं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, अधिवेशनात भाजपच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे. WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, अशी उपरोधिक टीका राणेंनी केल आहे.

थोडक्यात बातम्या-

ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

तुमच्या उपस्थित शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?; भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल

धक्कादायक! मुंबईतील हाॅटेलमध्ये खासदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या