बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साहेब आम्हाला ‘त्या’ गोष्टीची लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहित नाही”

अहमदनगर | केंद्रीय रस्ते व विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भ आणि मराठवाड्याविषयी अनेक प्रश्न मांडले. तसेच विदर्भातील दूध उत्पादनाबाबत देखील गडकरींनी यावेळी चिंता व्यक्त केली.

भूमीपूजन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी दूधाच्या माध्यमातून आपला विकास केला आहे. एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध उत्पादन होतं तेवढं संपूर्ण विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते. त्यांना वाटते की नाही माहित नाही.

मदर डेअरी सध्या 3 लाख लीटर दूध कलेक्ट करते. तेच दूध 10 लाख लीटरपर्यंत पोहोचलं पाहीजे, असं देखील गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्र सरकार ज्या ठिकाणी जागा देईल त्या ठिकाणी आम्ही विकास करायला तयार असल्याचं देखील गडकरींनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राबद्दल मला नेहमीच आस्था असते. मला नेहमी वाटतं की महाराष्ट्र संपूर्ण देशात नंबर एकवर राहिला हवा. यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो, असं देखील गडकरींनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

खड्ड्यांवरुन ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; अमित ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More