बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता करण जोहर करणार ‘बिग बाॅस 15’ चं सूत्रसंचालन!

मुंबई | अतिशय लोकप्रिय शो बिग बॉस या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सलमान खान सांभाळताना दिसतो. आता ‘बिग बॉस 15’ च्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र यावेळी सलमान खान नाही तर दिग्दर्शक, निर्माता करण जोहर सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

आता बिग बॉस 15च्या कार्यक्रमाची धुरा निर्माता, दिग्दर्शक करण जोहरकडे सोपवली आहे. बिग बॉस ओटीटीचं सूत्रसंचालन करण जोहर करतोय, त्यामूळे बिग बॉस शो बॉयकॉट करा, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. करण जोहरमुळे आता बिग बाॅस बघणार नाही असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

बिग बाॅस 15 हा कार्यक्रम आता तीन महिन्यांऐवजी सहा महिने चालणार आहे. तसेच हा कार्यक्रम सहा आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केला जाणार आहे. सहा आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टीव्हीवरून प्रसारित होणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटींसोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे.

दरम्यान, करण सूत्रसंचालनाची धूरा सांभाळणार म्हटल्यावर अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधत त्याला ट्रोल केलेलं आहे. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसही पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More