बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार

जयपूर | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही तसंच इतर अनेक गोष्टींच्या चर्चेला उधाण आलं. सोशल मिडियावर अनेकांना सुशांतच्या आत्महत्येला काही बडे अभिनेते जबाबदार असल्याचं म्हटलं. त्यातच आता सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी करणी सेनेने पुढाकार घेतला असल्याचं समजतंय.

करणी सेनेच्या माध्यमातून यापूर्वी अनेक सिनेमांना विरोध, सिनेमांविरूद्ध आंदोलनं छेडण्यात आली होती. त्यामुळे करणी सेनेबाबत बॉलिवूडमध्ये एक मोठी दहशत आहे. आता त्यातच करणी सेनेने सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी लढ्याची घोषणा केली आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंग मकराना यांनी एका व्हिडीओद्वारे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचं सांगितलं. तसंच सुशांत आम्हाला भावाप्रमाणे होता. त्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं आहे. अशा प्रकारचा अन्याय कधीही सहन केला जाणार नाही. आम्ही सुशांतच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत. याबाबतची दिशा पुढे ठरवण्यात येणार असल्याचंही महिपाल यांनी सांगितलं.

14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हळहळला. या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील नेपोटीझमचा मुद्दा ऐरणीवर आला.

ट्रेंडिंग बातम्या- 

MPSC निकालात मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान आणि आनंद वाटला- छत्रपती संभाजीराजे

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईन आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, या अभिनेत्रीचा दावा

महत्वाच्या बातम्या-

कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा-कॉलेज उघडू नका, कपील पाटलांचं मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र

कृषी मंत्र्यांचं स्टिंग ऑपरेशन, कामचुकार अधिकाऱ्यावर केली कारवाई

जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More