बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता खरे सुत्रधार बाहेर येतील, ही तर मोदी सरकारला मोठी चपराकच”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात पेगासस प्रकरण चांगलंच गाजताना दिसत आहे. देशीतल शेकडो लोकांवर पेगासस साॅफ्टेअरच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याचा गौप्यस्फोट अनेक वृत्तसंस्थांनी केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने ह आरोप फेटाळले होते. अशातच आता आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर दणका देत विशेष चौकशी समिती नेमली आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने या प्रकरणातही टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षेचा बाऊ करत माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु केंद्र सरकारच्या कोणत्याच नौटंकीला न जुमानता सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली. न्यायालयाने भाजप सरकारच्या हुकूमशाहीवृत्तीला जुमानले नाही. न्यायालयाने चौकशी समिती नेमणे ही मोदी सरकारला मोठी चपराकच असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

राज्यातील विचारवंतांच्या लॅपटॉपमध्ये मालवेअर टाकून त्यांना तुरुंगात टाकणे, पेगाससचा वापर करुन पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पाळत ठेवणण्याचं काम केलं. न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर राज्यातील हेरगिरी प्रकरणातील खरे सुत्रधारही बाहेर येतील, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह अनेक विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते. माझा फोन नंबर व अमजद खान असे नाव ठेवून थेट अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध जोडून फोन टॅप करण्यात आला होता. हा प्रश्न मी विधानसभेतही उपस्थित केला होता, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

अखेर पाकड्यांनी राग काढलाच! न्यूझीलंडच्या किवी खेळाडूंना डिवचलं; पाहा व्हिडीओ

ऐन दिवाळीत महागाईचा भडका! सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता

रडण्यानेही वजन कमी होतंय, कसं ते वाचा सविस्तर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More