मुंबई | राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
आज कुणीतरी मला व्हॉट्सअॅपवर पाठवलं की, मोदींना आज राज्यसभेत गहिवरुन आलं. त्यामुळं खरे मोदी कोण? हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारायला हवं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोदींना टोला लगावला.
भुजबळांना पत्रकारांनी राज्यसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारलं. मोदी पवारसाहेबांवर टीका पण करतात. यूटर्न केल्याचही बोलतात आणि युतीसुद्धा करतात, असं छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनावर बोलताना ‘आंदोलनजीवी’ हा शब्द वापरला होता. यावर आंदोलनजीवी कोण हे ठरवायच झालं तर काटा भाजपकडेच जातो, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘शिवसेना हे आमचं जुनं प्रेम त्यामुळे…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाईन गिफ्ट
बॅालिवूड सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं दुख:द निधन
‘तुम्ही भाषा बदलली नाही तर…’; निलेश राणेंचा राऊतांना इशारा
“मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे”
‘याला चिंधी बाजार म्हणतात साहेब’, निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र
Comments are closed.