बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात का होतेय डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ पाहून अनेकांनी सीएनजीवर चालणारी वाहनं किंवा इलेक्ट्रीक वाहनं खरेदी करण्यावर भर दिला आहे. मात्र त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या वाहनांनी संख्या घटली असून सध्या भारतात या वाहनांची संख्या केवळ 17 टक्क्यांवर आली आहे.

नुकतंच सोसायटी ऑफ इंडीयन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चर्स म्हणजे SIAM ने एक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ही माहिती समोर आली आहे. डिझेलवरील कार्सची संख्या कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डिझेलची वाढलेली किंमत. आता लवकरच डिझेल हे पेट्रोलच्या किंमतीला गाठणार असं चित्र असल्याने डिझेलवरील वाहनांची खरेदी आपोआपच कमी झाली आहे.

सुरूवातीच्या काळात शेतकऱ्यांना शेतीतील पाण्याच्या मोटारीसाठी डिझेल लागत असे. तसेच नव्याने आलेल्या आयटी कंपन्यांनी बॅकअपसाठी जनरेटर्स बसवलेले असायचे. त्या जनरेटर्ससाठी डिझेलची गरज पडत असे. या सर्व बाबींमुळे सरकार डिझेलवर अनुदान देत असे. त्यामुळे आपोआपच डिझेलची किंमत बऱ्यापैकी कमी असे. मात्र सरकारने 2014 पासून ते अनुदान बंद केलं आहे.

अनुदान बंद झाल्यानंतर डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच सरकारने इंधनावरील वाहनांपेक्षा पर्यावरणपूरक वाहनांच्या विक्रीसाठी धोरणं आखली आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि सीएनजीवरील वाहनांचा वापर वाढावा, असं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे डिझेलवरील वाहनांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने जरी ही बाब सकारात्मक असली तरीही देशाच्या विकासासाठी मात्र यामुळे अडथळा येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

कच्च्या तेलाच्या दरात घसरण पण पेट्रोल आणि डिझेलचे दर…

“ओ भाई… मारो मुझे… मारो” म्हणणारा मुलगा आठवतोय? तो आता परत आलाय, पाहा काय म्हणाला

भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, म्हणाले…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

पंतप्रधानांचा हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More