बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तापाने फणफणलेल्या भारताचा सुवर्णपदकवीर नीरजच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला…

नवी दिल्ली | ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राबाबत धक्कादायक माहिती समजत आहे. मागील दोन दिवसांपासुन त्याला ताप आला होता. त्यामुळे हरियाणा सरकारने आयोजित केलेल्या सत्कार समारंभालाही तो उपस्थितीत राहू शकला नव्हता. अशातच त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला आहे.

नीरज चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जेव्हा भारतात आला होता. तेव्हा तो सतत कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमध्ये सहभागी होत होता. अनेकांसोबत त्याच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्याला थकवा खुप जाणवू लागला त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याला कोरोना चाचणी करण्यास सांगितली. कोरोना चाचणीचा अहवाल निेगेटीव्ह आला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याने आता नवीन ध्येयाचा खुलासा केला आहे. पुढील वर्षी अमेरिकेमध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारताला अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदक जिंकून दिलं होतं. 2003 साली पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताला एकमेव पदक मिळालं होतं.

दरम्यान, अमेरिकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये पदक मिळवून मला अंजू जार्जच्या क्लबमध्ये सामील होण्याचं पुढील स्वप्न आहे, असं नीरजनं सांगितलं आहे. ऑलिम्पिकमध्ये नीरजला सुवर्ण पदक मिळवून देण्यात त्याचे जर्मन प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिट्झ यांचाही मोलाचा वाटा आहे. ऑलिम्पिक संपल्यानंतर क्लॉस त्यांच्या जर्मनीमधील गावात पोहचले त्यावेळी त्यांचाही तिथे सत्कार आणि गावकऱ्यांनी जल्लोष केला.

थोडक्यात बातम्या-

“नितीन गडकरींना शिवसेनेवर आरोप करायला दाढीवाल्याने सांगितलेत का?”

‘कर नाही त्याला डर कशाला’; भाजपने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर सुनिल शेळकेंचं प्रत्युत्तर!

‘चिक्कीचा ब्रँड माझ्या नावाने वाढत असेल तर…’; चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

‘या वयातही आशाताई काय दिसतात ना’; राज ठाकरेंनी केली आशा भोसलेंची प्रशंसा

मोठी बातमी! रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर रद्द, उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More