बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचा सेल्फगोल! “पक्षाच्या नाहीतर अपक्ष उमेदवाराला मतदान करा”

नागपूर | राज्याच्या राजकारणात (Politics) खळबळ माजवणारी घटना घडली आहे. मोठा गाजावाजा करत काॅंग्रेसनं (Congress) नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था (Nagpur MLC) मतदार संघासाठी आपला विधानपरिषदेचा उमेदवार घोषित केला होता. पण आता त्याचं भाजपमधून (BJP) आलेल्या उमेदवाराला बदलण्याची नामुष्की काॅंग्रेसवर आली आहे. असं झाल्यानं काॅंग्रेसची सर्वत्र नाचक्की होताना दिसतीये.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधून काॅंग्रेसमध्ये आलेल्या डाॅ. रविंद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्यानं उमेदवार बदलत असल्याचं पत्र प्रदेश काॅंग्रेसनं जारी केलं आहे. परिणामी आता काॅंग्रेसनं आपला पाठिंबा अपक्ष उमेदवार मगेश देशमुख यांना घोषित केला आहे. अशा रितीनं आता देशमुख हे काॅंग्रेसचे उमेदवार असणार आहेत.

नागपूर विधानसभा सदस्यपदासाठी 10 तारखेला म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. काॅंग्रेसनं आपल्या मित्रपक्षांनाही याबाबत कळवलं आहे. परिणामी आता भाजपच्या विजयाची फक्त औपचारिकचा बाकी राहिल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. काॅंग्रेसनं मोठ्या धूमधडाक्यात भोयर यांना काॅंग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. आरएसएसच्या पार्श्वभूमीचे नेते असूनही काॅंग्रेसनं त्यांना उमेदवारी दिल्यानं आधिच काॅंग्रेसला टीकेचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, नागपूरमधून भाजपनं दिग्गज नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. नागपूरमध्ये मागील काही काळापासून भाजपला शह देण्यात काॅंग्रेस यशस्वी झाली होती. पण यावेळी मात्र काॅंग्रेसच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत.

पाहा पत्र-


थोडक्यात बातम्या 

Second Dose घेतलाय का?; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राहुल गांधींचा दौरा! अजित पवार म्हणतात,”…मग आम्हाला विचार करावा लागेल”

सतत बसून काम करताय का? मग वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…म्हणून शिवसेनेला अधूनमधून शेण खायला संज्या लागतो – निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More