बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

नाशिक | आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचं कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली.

कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचं कळतंय. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांंनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचं असल्याचं म्हटलं. कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे.

या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलं आहे. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात आयकरने कारवाई केली. त्यामुळे कांद्याच्या भावात हजार ते दीड हजाराची घसरण केली. आपण कुठल्याही नियमबाह्य कामाचे समर्थन करणार नाही. मात्र केवळ दरवाढ झाल्यावरच छापेमारी करणं योग्य नाही. ही कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

…तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

“भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More