बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई | गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे मराठवाडा आणि घाटमाथा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबांचं क्षेत्र निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. त्यातच आता कमी दाबांच क्षेत्र आणखीच तीव्र होताना  दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने आज राज्यात मुंबईसह, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागांकडून अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्हात वेगवान वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज राज्यातील तीन जिल्हे वगळता सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं पहायला मिळतंय. अनेक ठिकाणी उभे असलेले पीक पाण्यामुळे वाया गेलं आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठ्या संकंटाचा सामना करावा लागतोय.

थोडक्यात बातम्या-

‘मुश्रीफांच्या आरोपामध्ये बूड असेल तर…’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

सुशांतसिंग राजपूत पुन्हा चर्चेत! ट्विटर अचानक ट्रेंड होतंय ‘CBI CONFIRMS SSR MURDER’

पैसे परत न दिल्यानं भरमंडईत महिलेची छेडछाड; महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More