बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. केंद्रातलं आणि महाराष्ट्राचं राजकारण, मनसेची वाटचाल, कोरोना काळातील अनुभव अशा अनेक विषयावर त्यांनी आपलं मत सर्वांसमोर मांडलं आहे. या मुलाखती दरम्यान अतुल भातखळकर हे माझ्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर अतुल भातखळकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही.  यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले होते. परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. 2009 च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना 2021 ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय, असं अतुल भातखळकर म्हणाले.

त्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला. अतुल भातखळकर तोंडावर पडले. ‘आमचा ‘राजा’ तुमच्या राजा सारखा खोट बोलत नाही’, असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी भाषणात बोललेलं खरं आहे. कोणता नेता त्यांच्याकडे गेला तर ते फोन करून सांगतात, असं या व्हिडीओमध्ये गडकरी सांगत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे.

दरम्यान, ‘पक्षातील माणसं सोडून जातातच. त्यांचं जाणं येणं चालूच असतं, माझ्या पक्षात देखील अनेकजण येण्यास तयार आहेत. मागे एकदा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. त्याच्या सोबत कोणीतरी लोखंडे देखील होते. मी गडकरींना फोन करून सांगितलं आणि त्यांना परत पाठवलं’, असं राज ठाकरे म्हणाले होते.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासी संख्या घटल्याने पुणे विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद

राज्यातील 12वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार?; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सुचक वक्तव्य

पुणे महापालिकेच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा खळखट्याक हातोडा; पाहा व्हिडिओ

टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘हे’ 3 गोलंदाज घेऊ शकतात भुवनेश्वर कुमारची जागा

“गरज नसताना उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More