बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फाजिल आत्मविश्वास नडला; सर्वांनी पाहिली तरंगणारी कार, पाहा व्हिडीओ

ठाणे | निसर्ग हा भल्या भल्या गोष्टींना उध्वस्त करत असतो. निसर्गाच्या कोपासमोर माणसाचं काहीच चालत नाही. मुंबई, ठाणे, पालघर यांच्याभोवती अथांग असा समुद्र पसरला आहे. या समुद्राच्या किनाऱ्यावर पर्यटनासाठी लाखो लोक जात असतात. यातील काही आपल्या फाजील आत्मविश्वासामुळे अडचणीत सापडतात. आताही अशीच नसती उठाठेव करणाऱ्या व्यक्तीला मोठं नुकसानं सोसावं लागणार होतं.

भाईंदर येथील उत्थन समुद्र किनाऱ्यावर एक कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी फिरायला आलेल्या एकानं आपली कार समुद्र किनाऱ्यावर पार्क केली आणि तो दिवसभर त्या गाडीकडं फिरकलाच नाही. संध्याकाळी आलेल्या भरतीने त्याची कार समुद्रात वाहून गेली. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मच्छिमारांनी प्रसंगावधानता राखत लगेच जेसीबी बोलावली आणि कार काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.

कार लाॅक असल्यानं त्याठिकाणी उपस्थित नागरिकांना ती कार लवकर बाहेर काढता आली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी, मच्छिमारांनी, उपस्थित नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्यानं कार अखेर पाण्यातून बाहेर काढली. शनिवारी दुपारी कारचालकानं ती कार या ठिकाणी पार्क केली होती. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, लोकांनी तरंगणारी कार पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. परिणामी कार काढताना बरीच मेहनत घ्यावी लागली. उपस्थित सर्वांनीच त्या फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या कार चालकाचं तोंडसूख घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

 

थोडक्यात बातम्या 

काळ्या फिती लावू, परंतु दुकाने सुरूच ठेवणार! महाराष्ट्र बंदला ‘या’ जिल्ह्यात विरोध

“सकाळी 6 ते रात्री 11 अजितदादांच्या कामाचा धडाका, डिपॉझिट उगीच जप्त होत नाही”

“देशाचे पंतप्रधान लखनऊला आले पण लखीमपूरला आले नाहीत”

“गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत, त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असणार”

पठ्ठ्याने आयफोन 12 मागवला, Flipkart ने भलतंच काही पाठवलं, व्हिडीओ पाहून सगळेच हैराण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More