Top News

“काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू व्हावं”

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यात यावं, असं वक्तव्य केलं आहे. तसेच या मागणीसाठी चिदंबरम यांनी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे, असं चिदंबरम यांनी  म्हटलंय.

केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असं चिदंबरम म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या