Top News देश

बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू मदतीसाठी पुढे सरसावली; केली 5 लाखांची मदत

Loading...

नवी दिल्ली |  दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा कानी पडत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आता करोनाविरोधातल्या लढ्यासाठी एकत्र येत आहेत. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनेही आपली सामाजिक जबाबदारी ओळखली आहे.

बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांची मदत दिली आहे. सिंधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याची घोषणा केली.

Loading...

बजरंग पुनिया, गौतम गंभीर या खेळाडूंनीदेखीलआपला पगार करोनाविरुद्ध लढ्यात सहायता निधीसाठी दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यानेही गरीब आणि गरजू व्यक्तींना तांदूळ वाटप करायचं ठरवलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोकांना या व्हायरसचा फटका बसला आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास बसला आहे. उद्योगपती, उदयोजक पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार- निर्मला सीतारामन

घरात येणाऱ्या माशांपासूनही कोरोना होऊ शकतो- अमिताभ बच्चन

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या