Top News विधानसभा निवडणूक 2019

पंकजा मुंडेंसह भाजपचे हे ‘दोन’ नेते गोपीनाथगडावर मनातील खदखद व्यक्त करणार?

मुंबई | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपचे अन्य दोन ज्येष्ठ नेतेही गोपिनाथगडावर उपस्थित राहू शकतात.

देवेंद्र फडणवीसांवर उघड नाराजी व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुंबईतील भाजपचे बडे नेते असलेले प्रकाश मेहता 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर जाण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सांगून खळबळ उडवून दिली आहे. अशातच एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता पक्षावर नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे हे तिन्ही नेते एकत्र येत मनातील खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक बंधू धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढवली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या