बाबांनी मुंबईतील गुंडगिरी संपवली, तशी मी बीडमधील गुंडगिरी संपवली!

बीड | गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील गँगवॉर आणि गुंडगिरी संपवली, तशी मी बीडमधील गुंडगिरी संपवली, असा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जातंय. 

परळीतील गोपीनाथ गडावर महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. चांगले काम करा आणि माझ्या पाठीशी उभे राहा, असं त्या म्हणाल्या. 

दरम्यान, 5 राज्याच्या निकालाने काही जण हुरळून गेले आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या 

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

-कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या

-नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!