“राजीनामा मागणारे विरोधक आणि…”; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर
मुंबई | राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत संपन्न झालं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अधिवेशनादरम्यान जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळालं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता अधिवेशनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून राजकारण झालं होतं. पंकजा मुंडेनी यावर बोलताना भाजपला आरसा दाखवला आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात फक्त हेच दिसलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशन व्हायला पाहीजे होतं. काश्मीर फाईल्सवर बोलतानाही पंकजा मुंडेंनी स्पष्ट भाष्य केलं आहे. मी अद्यापी सिनेमा पाहीला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. परिणामी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, पंकजा मुंडेंनी एसटी संपावर देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका मुंडेंनी केली आहे.
थोडक्यात बातम्या –
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! 10वी नापास देखील करू शकतात अर्ज
डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
“महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आता बॅगा भरून ठेवाव्यात”
डिजीटल माध्यमासाठीचा पत्रकारिता पुरस्कार ‘थोडक्यात’ला; कृष्णा वर्पेंचा सन्मान
कोरोनाच्या स्टेल्थ व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.