बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संसद भवन महत्त्वाचं की नागरिकांचं लसीकरण?”; पवारांचा रोखठोक सवाल

मुंबई | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. मात्र, ठाकरे सरकारने 1 मेपासून कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचं काम चालू असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य पाहून त्यानुसार प्राथमिकता ठरवावी लागते. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचं लसकरण ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी ₹ चा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडं केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून संसद भवनाच्या प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याआधी राषट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनीही टीका केली होती.

दरम्यान, संसद भवन किंवा इतर गोष्टींपेक्षा माणसं वाचवणं गरजेचं आहे. खासदारांचा केंद्राकडे पडून असलेला 196 कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी करत महाराष्ट्र सरकारने सर्व आमदारांना त्यांच्या आमदार निधीपैकी एक कोटी रुपयांचा निधी कोरोनाच्या कामांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. अशाच प्रकारचा निर्णय केंद्राने घेतल्यास लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामे करता येतील, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तात्याराव लहानेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्दयद्रावक घटना! बापाच्या कष्टाचं मुलानं चीज केलं इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं अन्…

‘धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी’; कोरोनाने मृत्यू झालेल्या भाजप आमदाराच्या मुलाने सरकारला सुनावलं

‘लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला?’; माजी प्राध्यापकाने कोरोना लस घेण्यास दिला नकार

राजीव सातव यांच्या प्रकृतीसंदर्भात समोर आली महत्वाची माहिती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More