बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर पार्थ पवार, म्हणाले…

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पावर अनेक जणांंनी टीका केली तर अनेक जणांनी या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे.

अर्थसंकल्पावर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. पार्थ पवार यांनी अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. तसेच र्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, अशी अपेक्षा पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या बजेटवर करोना महामारीचा परिणाम झाला असतानाही अर्थसंकल्पात विकासाच्या सर्वच गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यात आला, ही उल्लेखनीय बाब आहे. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे.

कोरोनामुंळे आर्थिक नियोजन कोलमडले असताना 10 हजार 226 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट कल्पना; हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री!

‘बाळासाहेब थोरातांकडून घटनाबाह्यरितीने काम’; ‘या’ शिवसेना खासदाराचा थोरातांवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक!

तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More