राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल?

मुंबई | राज्य कृषिमूल्य आयोगाला अध्यक्ष मिळण्याचे संकेत आहेत. येत्या १ जुलैला कृषी दिनाचे औचित्य साधून भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा होण्याची शक्यता आहे. 

२३ एप्रिल २०१५ रोजी राज्य कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती. शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत आयोगाला अध्यक्ष नेमून काम सुरु करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानूसार पाशा पटेल यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.