बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणं हा पर्याय नाही- प्रफुल्ल पटेल

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचना केली आहे. यावर भाजपनंतर थेट सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला जाहीर विरोध दर्शवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोदिंयातील एका पत्रकार परिषेदत बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो, असेही पटेलांनी नमूद केले. यामुळे लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबत दिसत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबद्दल आतापासूनच विरोध केला जात आहे. त्यामुळे आता या विषयावरुन नव्या वादाला तोंड फुटणार असं दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही काल लॉकडाऊनला विरोध केला होता. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”

‘कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर…’; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक दावा

शितल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येमागचं गुढ कायम

संजय राऊत मोठे नेते, सरकार स्थापनेत त्यांचं योगदान आहे पण…- बाळासाहेब थोरात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More