बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनता हेच सर्वात मोठं न्यायालय,आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही”

कोल्हापूर | सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला रोखठोक इशारा दिला. मंत्री अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं. आता आरक्षणावरुन पळवाटा काढायचं काम सुरू आहे. जनता हेच सर्वात मोठं न्यायालय आहे. आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केला.

आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं याचं स्पष्टीकरण द्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय अधिवेशन बोलवावं. सरकारनं मराठा आरक्षणाची भूमिका कधी घेणार हे सांगावं. तसंच ओबीसींप्रमाणे फी माफी करावी, अशी मागणी यावेळी आबासाहेब पाटील यांनी केली. सरकार आणि प्रशासन यांच्यात अनागोंदी कारभार सुरु आहे. स्पर्धा परीक्षांमधून निवड झालेल्या मुलांच्या निवडी रद्द करण्याचा हालचाली सुरु आहेत. असा प्रयत्न झाल्यास मराठा समाजाची मुलं मंत्रालयात घुसतील, असा इशारा त्यांनी दिला.

जनता हेच सर्वात मोठं न्यायालय आहे. आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, त्यांनी जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांच्याकडून जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली.

दरम्यान, मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तो पर्यंत महाराष्टात कोणतीही भरती होऊ देणार नाही. आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास एकाच वेळी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी ठोक मोर्चाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! शिक्षक महिलेने डाॅक्टर पतीला दिल्या झोपेच्या गोळा, नंतर दिला शाॅक अन्…

पत्नीला आपल्या छोट्या भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् पुढे झालं असं काही की…

…म्हणून 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण स्लो डाऊन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

“पैसे दिलेच नाहीत तर मग ईडी कशाला? हा मोदी सरकारचा राजकीय छळ”

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला बळी?; रुग्णालय प्रशासनाचा बोलण्यास नकार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More