बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहरूख खानसारखी लोकं इथं कमावतात आणि पाकिस्तानला मदत करतात”

नवी दिल्ली | बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणावरून देशातील राजकारण तापलेलं दिसतंय. अनेक कलाकारांनी आर्यनच्या समर्थनात पोस्ट लिहिल्या आहेत. अशातच आता भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शाहरूख खानवर निशाणा साधला आहे.

शाहरूख खानने जेव्हाही मदत केली आहे, ती पाकिस्तानची केली आहे. त्याने भारताला कधीही मदत केली नाही. ते इथं कमावतात पण पाठवतात पाकिस्तानला, अशी टीका प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली आहे. त्यांचं वास्तव आता समोर येत आहे. बाकी जे शिल्लक आहे, ते सुद्धा लवकरच समोर येईल, असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. शाहरूख खानचं नाव न घेता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी टीका केली आहे.

अशा देशभक्तांची गरज नाही. फक्त देशभक्तच इथे राहतील. बाॅलिवूडचं जग ग्लाॅमरस आहे. या लोकांनी ते जग स्विकारलं आहे. ते जमिनीवरील जीवन स्विकारत नाहीत. त्यामुळे त्यांना या गोष्टीची मदत घ्यावी लागते, अशी टीका देखील प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाॅलिवूडमध्ये ज्यांनी जास्त पैसे कमावलेत आणि ज्यांनी त्यांचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले नाहीत, त्यांचीच मुले वाईट मार्गावर आहेत, असंही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

ह्रतिक रोशनने आर्यनला दिलेल्या पाठिंब्यामुळं कंगना भडकली; म्हणाली…

मोठी बातमी! ड्रग्स बाळगण्याप्रकरणी आर्यन खानला ‘इतक्या’ दिवसाची न्यायालयीन कोठडी

“मंदिरं उघडली आणि भाजपचा ढोंगी चेहरा समोर आला”

मोहन डेलकरांच्या कुटुंबियांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ कांदबरीकाराला जाहीर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More