Top News परभणी महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सलग वाढत असताना पहायला मिळत आहेत, त्यातच देशातील सर्वात महाग पेट्रोल असलेला जिल्हा म्हणून चर्चेत असलेल्या परभणीने तर आता शंभरी पार करत इतिहास रचला आहे. राज्यात इंधनाचे चढते दर हा चिंतेचा विषय बनला असताना पेट्रोलने शंभरी गाठणे म्हणजे सरकारने आगीत तेल ओतण्यासारखेच आहे.

महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने असा भडका घेतला आहे की, आता गाडी वापरायची की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या प्रीमियम पेट्रोलचे दर शंभरी पार गेले असून काही भागातील पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे-

पेट्रोलचे दर (प्रति लिटर) 

  जिल्हा                  साधे               प्रिमियम 

परभणी                 97.34              100.76

नांदेड                   97.21               99.99

हिंगोली               96.09               99.77

औरंगाबाद             96.35                99.81

जळगाव                 96.25               99.10

नागपूर                95.69                 99.15

मुंबई                  95.16                  98.13

नवी दिल्ली            88.73                91.56

महाराष्ट्रातील काही ठिकाणी जुन्या पेट्रोल पंपावर ३ आकडे दाखवणारी मशीन नसल्यामुळे पेट्रोल पंप चालकांची चांगलीच तारांबळ उडाली, विशेष म्हणजे पंप चालकांना त्यामुळे पेट्रोलची विक्री थांबवून पंप बंद करण्याची वेळ आली. कधी काळी स्वप्नातही विचार न केलेले इंधनाचे दर सध्या बघायला मिळत असताना आणि पेट्रोल पंप चालकांची झालेली तारांबळ बघून सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

परभणीमध्ये काही नागरिकांनी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलची शतकपूर्ती झाल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करत क्रिकेटची बॅट आणि हेल्मेट दाखवून शतकवीर खेळाडूप्रमाणे इंधन दरवाढीबाबत निषेध नोंदवला. ‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी’ ही प्रचलित उक्ती या इंधन दरवाढीला साजेशी ठरते.

थोडक्यात बातम्या-

“संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका, आमच्या पूजाचे कोणासोबतही संबंध नव्हते”

“पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख गप्प का?”

‘महाराजांनी लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यामुळे…’; शिवजयंतीवर उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य

“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”

शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना सल्ला, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या