बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही; प्रशासनाची धक्कादायक कबुली

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच काही ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचंही वास्तव समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारतर्फे कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून आता व्हेंटिलेटर बेड्सबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे एकीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असतानाच पिंपरी चिंचवडचे आरोग्य प्रमुख अनिल रॉय यांनी कोरोना बेड्सबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं स्वतः पिंपरी-चिंचवड आरोग्य प्रमुख अनिल रॉय यांनी सांगितलं आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये जम्बो कोव्हिड सेंटरला 50 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला जिल्हा म्हणून पुणे जिल्हा घोषित केला गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावून मिनी लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली. पण त्यानंतरही पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन त्या अपुर्‍या पडत असल्याचं चित्र समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या

लस उत्सवावरून राहूल गांधींचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केलं ‘हे’ आवाहन

“कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र कसा सांभाळणार”

…म्हणून रोहित शर्मा इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमार यादवनं सांगितलं कारण

फक्त दोन षटकार आणि कायरन पोलार्डच्या नावावर होणार ‘हा’ जबरदस्त विश्वविक्रम!

केंद्र सरकारच्या पाया पडायला लागलं तरी चालेल पण…- जितेंद्र आव्हाड

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More