Top News पुणे महाराष्ट्र

…अशा लोकांनी ‘दुसरा उद्योग’ बघावा; कृष्ण प्रकाश यांच्या इशाऱ्याने अनेकांचे धाबे दणाणले

पिंपरी-चिंचवड | शहरात कायद्याचे पालन करणारे अनेकजण आहेत, मात्र काही मोजके गुन्हेगार, व्हाईट कॉलर गुन्हेगार, लँड माफिया तसेच दादा आणि भाऊंनी कायद्याचे उल्लंघन करत गुन्हेगारी वाढवली आहे, अशा सर्वांनी मी आहे तो पर्यंत दुसरा उद्योग बघावा, अन्यथा मी आहेच, अशा शब्दात नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्व सामान्यांसाठी मी २४ तास उपलब्ध आहे. कुणाला काही अडचण असेल तर नागरिकांनी मला मेसेज करावा, असं आवाहन कृष्ण प्रकाश यांनी यावेळी केलं तसेच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ कार्यपद्धत राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

शहरात यापुढे माथाडी दादा, व्हाईट कॉलर दादा, लँड माफिया यांचे धंदे चालणार नाही.जे कायद्यात बसते ते जरूर करावे, कायदा मोडणाऱ्यांची पोलीस कंबर मोडतील. माझ्या पगारात मी समाधानी आहे, माझी कुठेही बदली केली तरी माझा पगार तेवढाच राहणार आहे, असं ते म्हणाले.

मी ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणचा मी पहिला पूर्ण अभ्यास करतो. त्यामुळे मला दोन दिवस द्या, मला अभ्यास करू द्या, माझ्या सर्व अधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ बोलू द्या, त्यांच्या समस्या जाणून घेऊन द्या. मग मी दोन दिवसानंतर शहर साफ करण्याचे काम सुरु करतो, असंही कृष्ण प्रकाश म्हणाले. यामुळे शहरातील भल्या भल्या गुन्हेगारांचे धाबे आता दणाणले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-‘

“या व्यक्तीचे आणि एका महिलेचे नग्न फोटो माझ्याकडे होते, मी ते वरिष्ठांना दाखवले”

 ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या नावाचे मी पुस्तक लिहिणार- एकनाथ खडसे

PUBG ला आता FAU-G चा पर्याय; अक्षय कुमारने केली घोषणा

ना भूले है, ना भूलने देंगे, भाजपने छापले सुशांतचे स्टिकर्स

पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार- राजेश टोपे

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या