महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ

मुंबई | गेल्या महिनाभर लाखो शेतकरी दिल्लीतील हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतही ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून आंदोलन संपवावे, असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय.

गडहिंग्लज येथील सलोखा परिषदेच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनाला मंत्री मुश्रीफ यांनी पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मधून मुक्तचिंतन करताना दिसत आहेत. मात्र, शेतकऱ्यांशी बोलायला त्यांना अपमान वाटतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

कोणताही कायदा तयार करताना संबंधित घटकांवर दूरगामी परिणाम होत असतात. त्यामुळे त्यावर समर्पक चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता तीन कृषी विधेयके सभागृहात मंजूर केली आहेत. पण यातील करार शेतीची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. शिवाय पिकांना हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळेच शेतकरी या काळ्या कायद्यांविरोधात गेले महिनाभर थंडीची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…नाही तर मी राजीनामा देईल’; सुजय विखे पाटील भडकले

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

तो स्कूटर घेऊन गल्लीबोळात हिंडत होता; स्कूटरमध्ये निघाली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या