बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

नवी दिल्ली | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत नटू काका यांचे पात्र साकारणारे घनश्याम नायक यांचं नुकतंच निधन झालं आहे. मागील 1 वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि 3 ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरद्वारे घनश्याम यांना श्रद्धांजली वाहत दुख: व्यक्त केलं आहे.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी घनश्याम नायक यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले की, मागील काही दिवसात आम्ही दोन प्रतिभावान अभिनेते गमावले आहेत. ज्यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. श्री घनश्याम नायक त्यांच्या भूमिकेसाठी कायमच लक्षात राहतील. खास करून त्यांच्या प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील विशेष भुमिकेसाठी. ते खुप द्याळू आणि प्रेमळ होते.

घनश्याम नायक यांनी अगदी शेवटच्या दिवसांतही ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेत काम केलं. त्यांनी अगदी अखेरच्या काही दिवसांमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने मालिका सोडली. घनश्याम नायक यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘लज्जा’,’तेरे नाम’, ‘खाकी’, ‘चायना गेट’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी रामानंद सागर लिखीत ‘रामायण’ मध्ये रावणाची भुमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनाही श्रद्धांजली वाहिली आहे. त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते मागील अनेक दिवस आजारी होते. त्रिवेदी यांनी गुजराती चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी जवळजवळ 300 चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय राजकारणातही त्रिवेदी चांगलेच सक्रिय होते. 1991मध्ये त्यांनी गुजरातच्या साबरकांठा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये त्यांना विजय मिळाला होता.

 

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! कोरोना लसीनंतर आता येणार ‘या’ साथीच्या रोगाची लस

आर्यन खान घरी जाणार की रवानगी पुन्हा कोठडीत होणार? आज होणार निर्णय

महिला ओरडत असतानासुद्धा चालत्या गाडीला रोखून केला अश्लील स्पर्श, निर्लज्ज गुंडांचा व्हिडीओ व्हायरल

देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढली; पण सक्रिय बाधितांची संख्या मात्र नियंत्रणात?

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More