मोदींचे असत्याचे प्रयोग; राष्ट्रवादीने बनवला व्हीडिओ

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या  वक्तव्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

मोदींनी रडार, डीजिटल फोटो, मेल याबाबतच्या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनीदेखील मोदींना सोशल मीडियावर चांगलंच धारेवर धरलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवरुन एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत जनतेशी खोटं बोलल्याचं मोजमापन केलं आहे.

मोदींनी केलेल्या खोट्या वक्तव्यांची काही उदाहरणे त्या व्हीडिओमध्ये पाहायला मिळतात. ‘मोदींचे असत्याचे प्रयोग’ असं त्याला कॅप्शन देण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-मी मालमत्ता जमवल्याचं सिद्ध करा; मोदींचं खुलं आव्हान

-…तरीही पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल- नितीन गडकरी

-पश्चिम बंगालमधील शहांच्या रॅलीत हिंसाचार; योगींची रॅली रद्द

-गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ हा संपूर्ण देशासाठी कलंक- मायावती

-“अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले”