बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिक्षा चालकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसाला 50 हजारांचा दंड

मुंबई | मुंबईमधील विरार परिसरातील रिक्षा चालकास शिवीगाळ करणाऱ्या पोलिस शिपायाला राज्य मानवी हक्क आयोगाने 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. जगदिश पाटील असं या पोलिस शिपायाचे नाव असून तो विरार पोलिस ठाण्यात नोकरी करत आहे.

रिक्षा चालकाचा एका प्रवाशासोबत वाद झाल्यामुळे त्याचा परवाना जप्त केला होता. परवाना परत घेण्यासाठी तो विरार पोलिस ठाण्यात गेला होता, तेव्हा पोलिस शिपाई जगदिश पाटील याने त्या रिक्षाचालकाला शिवीगाळ केली होती.

शिव्या देतानाचा प्रकार रिक्षाचालकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.  शिवीगाळबाबत त्याने विभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. पण काही वरिष्ठ पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.

दरम्यान, न्याय मागण्यासाठी रिक्षाचालकाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर आयोगाने पोलिसाला दंड ठोठावला.

महत्वाच्या बातम्या

“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

-“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

-चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

-निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

-हे एक दिवस देशाचा तालिबान करतील; आनंद महिंद्रा भाजप नेत्यांवर भडकले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More