बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे | पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याने सुसाईड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाना हंडाळ असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते. नाना हंडाळ यांच्या आत्महत्येने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

नाना हंडाळ शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते. त्यांना एक मुलगी आहे. नाना हंडाळ यांनी शुक्रवारी संध्याकाळी 4 ते 7 च्या दरम्यान कुटुंबीय बाहेर गेल्यानंतर गळफास लावून घेतला.

नाना हंडाळ बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. समीरच्या आत्महत्येमुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली गेली. तसेच प्रेमप्रकरणातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

6 महिन्यांच्या तीरा कामतला अखेर ‘ते’ 16 कोटींचं औषध मिळालं!

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे

भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती

मोठी बातमी! 10 आणि 12 च्या बोर्डाच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

‘तुम्ही कोणाचीही तोंड चिपकवा मला….;’ चित्रा वाघ आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More