Top News

‘पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता’; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला, असं अनिल देखमुखांनी सांगितलं आहे.

आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असं वारंवार सांगितलं गेलं, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरं काम द्या असं सांगितलं होतं. तसेच्या त्यावेळी एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला, असंही अनिल देशमुख म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे”

“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण!

“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या