पुणे | परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या तरी यासंदर्भात कुठलीही लक्षणं दिसत नसली तरी या प्रकरणातील अरुण राठोड गायब झाल्याची बातमी न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीनं दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ऑ़डिओ कॉल्स समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यामध्ये मंत्र्यासोबत बोलणारा अरुण राठोड होता. त्यामुळे या प्रकरणात तो महत्त्वाचा साक्षीदार मानला जात होता. मात्र न्यूज १८ च्या टीमने त्याचं घर गाठलं असतो, घराला कुलुप लागलेलं दिसलं. आपल्या कुटुंबाला घेऊन तो गायब झाल्याचं समोर आलं आहे.
पूजा पुण्यात अरुण आणि त्याच्या एका मित्रासोबत राहात होती अशी माहिती आहे. त्यामुळे पुजासोबत नेमकं काय झालं, संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेतलं जातंय तर त्यांची भूमिका काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अरुणला माहीत असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अरुण राठोड या प्रकरणातील महत्त्वाचा धागा असल्याने त्याच्यावर दबाव असल्याची माहिती आहे. त्याच्यासह त्याच्या कुटुबियांच्या जीवाला धोका असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!
अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज
आता ‘या’ मुलानं लावली सोशल मीडियावर आग, लोक परत परत पाहात आहेत व्हिडीओ!
पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपवा; नितीन गडकरींचे सक्त आदेश
…नाहीतर काम उखडून फेकीन; पुण्यात नितीन गडकरींची कंत्राटदाराला तंबी!
Comments are closed.